बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!


बार्शी सोलापूर रोडवर , कार  आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार  तरुणाचा मृत्यू..!

 5 जून :- महाशाही न्यूज मराठी बार्शी प्रतिनिधी 
बार्शी सोलापूर रोडवर पानगाव परिसरात  भोगावती नदीजवळ आज दिनांक 5 जुलै 2025 रोजी दुपारी 12 च्या सुमारास कार आणि टूव्हीलर गाडीचा भीषण अपघात झाला.


त्यात अक्षय राजू ताटे  वय 26 वर्षे , रहाणार दत्तनगर, नाळे प्लॉट, बार्शी याचा मृत्यू झाला. कार  क्रमांक .MH 37 V 579 ने मोटारसायकल क्रमांक. MH 13 CF 3722 ला दिलेल्या धडकेत हा अपघात घडला.सदर प्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .



अक्षय ताटे, हा वैराग येथील नायका कॉस्मेटिक कंपनीत सेल्समन म्हणून काम करीत होता, सकाळी 11/15 वाजता बार्शीहून वैरागला कंपनीच्या कामानिमित्त मोटारसायकलवर निघाला होता. दुपारी 12 च्या सुमारास भोगावती नदीच्या पुलाजवळ मागून येणाऱ्या कारने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यात अक्षयच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

108 रुग्णवाहिकेमधून त्याला बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातात कारमधील लोकं ही जखमी झाले आहेत.

पोलिसांनी भादंवि कलम 304 - अ आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. कार आणि टूव्हीलर ताब्यात घेतल्या असून, कार  चालकाचा शोध सुरू आहे.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...