पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...
पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...
महाशाही न्यूज मराठी :- गणेश धनवडे
नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटी, निरवांगी चे पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे आज मंगळवार दिनांक 18.03.2025 येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रा. डॉ. श्री हणमंत संपतराव पोळ, संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री विठ्ठल भुजाबा पवार, सचिव मा. श्री पांडुरंग भानुदास पाटील, मा. शिवाजीराव संपतराव पोळ, मा. श्री उत्तम नंदू पोळ उपस्थित होते. सदर स्मार्ट डिजिटल बोर्ड आपल्या गावातील, माजी विद्यार्थी मा. श्री बापू नामदेव नांगरे यांच्या चर्चेतून आणि सहकार्यातून तसेच उर्मी संस्थेच्या सीएसआर फंडातून जवळपास पाच लाखापर्यंत तीन स्मार्ट डिजिटल बोर्ड आणि विज्ञान प्रात्यक्षिक साहित्य विद्यालयास भेट म्हणून देण्यात आले, उर्मी संस्था संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राहुल शेंडे साहेब यांच्या सहकार्यातून, यावेळी माननीय श्री बापू नामदेव नांगरे, मा. स्वप्निल देशमुख साहेब, मा. संदीप जाधव, मा. स्नेहल कवळे मॅडम, मा. पांडुरंग सुरवसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

स्ट्रीमलँड, मीडिया इंडिया प्रायव्हेटेड लिमिटेड, पुणे या कंपनीचा यामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. यावेळी बापूसाहेब नांगरे यांचे वडील माननीय श्री नामदेव निवृत्ती नांगरे आणि संस्था पदाधिकारी या मान्यवरांच्या हस्ते डिजिटल बोर्डचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले,
यावेळी माननीय श्री बापूसाहेब नांगरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माझ्या गावातील माझ्या शाळेबद्दल मला अभिमान आहे, इंदापूर तालुक्यातील एक आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून या शाळेकडे पाहिले जाते, याच विद्यालयातून शिक्षण घेऊन गावातील बरेच विद्यार्थी उंच शिखरावर पोहोचले आहेत, चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत.
या पुढील काळात विद्यालयाच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान जास्तीत जास्त मिळावे यासाठी मी कटिबद्ध आहे आणि तसा भविष्यामध्ये प्रयत्न करीत राहील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात व्हावे म्हणून मी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली. संस्थेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री हणमंत संपतराव पोळ यांनी सर्व टीमचे आणि कंपनीचे मनापासून आभार व्यक्त केले, विद्यालयासाठी जी भरीव मदत केली त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, सदर उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद आहे आणि आपल्या गावातील एका गुणवान विद्यार्थ्याने शाळेविषयी केलेली मदत आणि सहानुभूती संस्था कधी विसरणार नाही अशी ग्वाही दिली.
आणि उर्मी संस्थेने केलेल्या मदतीबद्दल सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, सर्व पालक आपल्या ऋणात राहून संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री शिरसट सर यांनी विद्यालयाच्या प्रगती बद्दल माहिती सांगून, सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयातील सहशिक्षिका सौ. भोसले मॅडम यांनी केले, आणि कार्यक्रमाचा समारोप श्री भोंग सर यांनी केला.