बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...
[ महाशाही न्यूज मराठी ]
बार्शी तालुक्यातील कोरफळे या गावात काल दिनांक 3 मार्च 2025 रोजी सायंकाळी घडलेल्या एका किरकोळ वादातून बापानेच आपल्या मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बार्शी तालुक्यातील कोरफळे या गावात काल दिनांक 3 मार्च 2025 रोजी सायंकाळी घडलेल्या एका किरकोळ वादातून बापानेच आपल्या मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत ची घडलेली सविस्तर माहिती अशी की, सौ. स्वाती सोमनाथ ठाकरे [ वय 19 वर्षे ] यांनी बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीत त्यांनी सांगितले की, त्यांचे पती सोमनाथ ठाकरे वय 23 वर्षे हे मिस्त्री काम करून उपजीविका भागवत होते. त्यांच्या सासऱ्यांना व पतीला दारूचे व्यसन होते, आणि त्यावरून अनेकदा दोघांमध्ये भांडणे होत होती .
काल दिनांक 3 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे पती सोमनाथ यांनी आपल्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचा बदाम विकून गाडीचा हप्ता भरायचा असल्याचे सांगितले. मात्र फिर्यादीने तो बदाम आपल्या सासऱ्यांकडे सुरक्षित ठेवला. यावरून पतीसोबत त्यांचे वाद झाले. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता सोमनाथ ठाकरे मोटारसायकल घेऊन घराबाहेर पडले.
थोड्याच वेळात गावात चर्चा सुरू झाली की, परसातील घरासमोर काहीतरी घडले आहे. त्यावेळी फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या अश्विनी यांनी त्यांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर फिर्यादीने पाहिले की, त्यांचे पती सोमनाथ ठाकरे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सासू मोठ्याने रडत होती आणि सासरे देखील तिथेच उपस्थित होते.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, तिच्या सासूने सांगितले की, वडिलांनी माझ्या मुलाचा सोन्याचा बदाम का घेतला यावरून वाद झाला आणि त्यावेळी सासऱ्यांनी [ किरण ठाकरे ] सोमनाथ यांच्या डोक्यात दगड फेकून मारला. त्यानंतर मोठा दगड उचलून पुन्हा चेहऱ्यावर आणि डोक्यावर जोरात मारून त्यांना ठार केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले , मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आरोपी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


