मोटरसायकल अपघात मोटरसायकलस्वार जखःमी..


मोटरसायकल अपघात मोटरसायकलस्वार जखःमी..

महाशाही न्यूज मराठी [ तानाजी मारकड ]
आज बारामती वरून रूई बाबीरनगरीला वडलांच्या बरोबर येत होतो, त्यावेळी लाकडी गावाच्या पुढे रस्त्याच्या कडेला मुरूम टाकला होता, त्याच्यावर टु व्हीलर गाडी जावून अपघात झाला,सणसर जवळचा काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणारा मुस्लिम समाजातील तरूण रस्त्यावर आढवा पडला होता, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता, जवळुन गाड्या जात होत्या कुणीही त्या युवकाच्या दुःखात मदतीला येत नव्हते.


 मोजके तरूण मदतीसाठी याचना करत होते, त्यावेळी तिथे थांबलो,१०८ नंबर वर फोन केला, ॲम्बुलन्स बोलवली, त्यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईल घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना काही सहकार्यानी कळवले, ॲम्बुलन्सला व खासगी गाड्यांना फोन केले, त्यावेळी त्या तरूणाला दवाखान्यात नेण्यासाठी एक ॲम्बुलन्स आली, त्यामध्ये टाकून त्याला त्याच्या कुटुंबियांसमवेत दवाखान्यात पाठवला, यावेळी कुणाच्यातरी दुःखात सहभागी होऊन मदत केल्याचं समाधान मिळालं.

या धकाधकीच्या जीवनात कुणाचा काही भरवसा नाही पण एकमेकांना साह्य करत मदत केली तर समाधान लाभतं,
परमेश्वर हा सत्य संकल्पनांचा पाठीराखा आहे, तुम्ही एखाद्या अडचणीत असणार्या व्यक्तीला मदत केली,तर तुमच्या अडचणीच्या काळात मानसाच्या रूपात तुम्हाला परमेश्वर मदत करतो, अडचणीत अपघातग्रस्तांना मदत करा,  तानाजी मारकड अध्यक्ष-जय हनुमान बहुउद्देशीय संस्था (भारत सरकारचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त)
मो 8975838473 

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...