तशी राज्याची आर्थिक स्थिती नाजूक नाही, पण लाडक्या बहिणींमुळेच संकटात आहे ; आमदार संजय गायकवाड..!
महाशाही न्यूज मराठी :- परशुराम राऊत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. कारण या योजनेसाठी वेगवेगळ्या विभागांचा निधी हा महिला व बाल कल्याण विभागाकडे वळवला आसल्याची तक्रार अनेक आमदार व मंत्री करीत आहेत त्यात शिवसेना ( शिंदे ) आमदार संजय गायकवाड हे म्हणतात की लाडकी बहीण योजनेमुळे राज्य संकटात आहे. कारण या योजनेमुळे इतर कुठल्याही योजनेला पैसे मिळालेले नाहीत. मागील अधिवेशनात जाहीर झालेला निधी ही अध्यापतरी "कोणत्याही आमदाराला मिळालेला नाही. ”

“केवळ शिवसेना ( शिंदे ) आमदारांनाच नाही तर कोणत्याच पक्षांच्या आमदारांना निधी मिळालेला नाही. शिवाय एकाही आमदाराला बजेटचे पैसे ही मिळालेले नाहीत. तसेच कुठल्याच विभागाला, कोणत्याही योजनेसाठी पैसे मिळालेले नाहीत. परंतु, कुठलाही आमदार याबद्दल काही बोलत नाही. सर्वजण फक्त लाडक्या बहिणींना सांभाळा असंच म्हणत आहेत. या शिवाय दुसरं कोणी काही बोललेलं नाही. परंतु एक मात्र निश्चित सर्व काही समाधानकारक होईल...