रणसिंग महाविद्यालयात उद्बोधन वर्ग संपन्न...


रणसिंग महाविद्यालयात उद्बोधन वर्ग संपन्न... 
महाशाही न्यूज मराठी  :- गणेश धनवडे 
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब  ता. इंदापूर महाविद्यालयात सोमवार दि. २३ जून ते शनिवार दि.२८ जून या दरम्यान उद्बोधन वर्ग संपन्न झाला.


उदबोधन वर्गाचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ. विजय केसकर, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग ,आय क्यु एस सी विभाग प्रमुख डॉ प्रशांत शिंदे उपस्थित होते. उद्बोधन वर्गात तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती  डॉ. जनार्दन पवार ,डॉ. विवेक बळे ,डॉ.अरुण मगर ,प्रा. अशोक काळंगे, मुगुटराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर चे डॉ. संजू जाधव, विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक राजेंद्रकुमार डांगे यांनी उद्बोधन वर्गात प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी महाविद्यालयात विद्यार्थी हिताच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण उपक्रम होण्यासाठी शासनाने कार्यक्रम हाती घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. 

नविन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी यांची मध्यवर्ती भूमिका विचारात घेऊन शैक्षणिक कार्यक्रम प्राध्यापक घेत असल्यामुळे भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी सर्व क्षेत्रात प्रगती करतील असे सांगितले.

या वर्गात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ,भूमिका आणि जबाबदारी ,शिक्षण पद्धती, मूल्यांकन ,अभ्यासक्रम आधारित उपक्रम, शैक्षणिक व संशोधन योगदान, विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रम, व्यावसायिक नीती मूल्य ,कार्य संस्कृती ,नॅक च्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे व दस्तावेज यांची माहिती प्राध्यापकांना या उद्बोधन वर्गात दिली. यावेळी शारीरिक शिक्षण संचालक सुहास भैरट,प्राध्यापक डॉ. रामचंद्र पाखरे,डॉ. विलास बुवा,प्रा. ज्योत्स्ना गायकवाड,ग्रंथपाल विनायक शिंदे  इत्यादी मान्यवर व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर  कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...