रणसिंग महाविद्यालयाकडून वारकऱ्यांना बिस्किट पुड्यांचे वाटप...
महाशाही न्यूज मराठी :- कळंब प्रतिनिधी
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयात श्री संत सोपान देव महाराज पालखी सोहळा व श्री संतराज महाराज पालखी सोहळा निमित्ताने वारकऱ्यांना ७००० बिस्किट पुड्यांचे वाटप इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वस्त शंकरराव रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय केसकर ,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक राजेंद्रकुमार डांगे,प्रा.ज्योत्सना गायकवाड, प्रा. डॉ.रामचंद्र पाखरे, प्रा.डॉ.विलास बुवा,ग्रंथपाल विनायक शिंदे इत्यादी मान्यवर व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळत असल्याने महाविद्यालय व संस्था या सेवेत सहभागी होवून आषाढी वारीसाठी वारकरी बंधूंचे प्रत्येक वर्षी सेवा करत असतात.
या वारकऱ्यांची सेवा करण्याचेसदभाग्य बीकेबीएन रस्त्यावरील आमच्या महाविद्यालयास मिळत असल्याचे संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी सांगितले.