बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या कौतुकास्पद कार्यामुळे एकता महिला मंच बार्शीच्या वतीने सत्कार....
बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या कौतुकास्पद कार्यामुळे एकता महिला मंच बार्शीच्या वतीने सत्कार....
एकता महिला मंच बार्शीच्या वतीने बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी केलेल्या विविध कौतुकास्पद कार्यामुळे त्यांचा सत्कार व सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा सत्कार व सन्मान करण्यामागचा विशेष कारण म्हणजे बार्शी शहरातील एका महिला सदस्या अश्विनी शर्मा यांचा मुलगा हर्ष शर्मा हा 8 जून 2025 रोजी हरला होता त्याची तक्रार त्यांच्या पालकांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिली होती त्या अनुषंगाने बार्शी शहरातील पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व त्यांच्या सर्व टीमने मिळून 24 तासाच्या आत त्या मुलाला शोधून काढून आई-वडिलांच्या सुखरूप स्वाधीन केले त्याची पावती म्हणून एकता महिला मंच बार्शी तालुक्याच्या वतीने पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजितकरण्यात आला.
या प्रसंगी बोलतांना पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे म्हणाले की एकता महिला मंचचे कार्य खरोखरच स्तुत्य आहे. तुम्ही आज जो आमचा सत्कार व सन्मान केल्यामुळे आमचा काम करण्यचा उत्साह निश्चितच वाढेल त्यामुळे एकता महिला मंचच्या सर्व सभासदांचे आभार आणि इथून पुढे होणाऱ्या सामाजिक कार्यामध्ये महिला मंचला शुभेच्छा.
एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर, तसेच एकता महिला मंचच्या शालन दसवंत, नुरजहा शेख, जास्मिन शेख, सविता आपुणे, पल्लवी भालेराव, शबनम सय्यद, दीपाली गरड,पूजा दराडे, स्वाती चव्हाण, ज्योती आपुणे,मनीषा सुतार, सविता दसवंत,जयश्री दसवंत, मनीषा काजळे,सुकनंदा सुरवसे,शुभांगी भड, कोमल काजळे, महादेवी माने, मधुरा दसवंत,करिष्मा शेख, मैनाबाई जाधव,रत्नमाला कोळी,सारिका जाधव अदी मान्यवर उपस्थित होते.


