" तुझ्या बापाला पेरणीला पैसे अंगावरचे कपडे आम्हीच दिलेत ", भाजपा आमदार लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य..
सोशल मीडियावर सरकारवर आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरूणांना समजदेण्यासाठी बोलत असताना भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली.
जालना जिल्ह्यातील परतुर येथील सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना त्यानी वादग्रस्त वक्तव्य केलं. टीकाकारांवर बोलत असताना हे ऐकायला मिळालं ते म्हणाले की “तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले”, एवढेच नाही तर “तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतोय. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट व चपला ही आम्हीच दिलेत.
पुढे बोलतांना बबनराव लोणीकर म्हणाले, “ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्यांच्या हातातलं डबडं, ते देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्यवरच तंगड्या वर करतो. आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का ? असेही शेवटी म्हणाले या केलेल्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.


