दत्तात्रेय ( मामा) भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी येथील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना वह्यांचे...
दत्तात्रेय ( मामा) भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी येथील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना वह्यांचे...
इंदापूर तालुक्याचे आमदार, महाराष्ट्र राज्य सरकार मधील कॅबिनेट मंत्री, क्रीडा व युवक कल्याण मंत्री, वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री दत्तात्रेय ( मामा) भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगी येथे मंगळवार दिनांक 23 जून2025 रोजी विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना वह्यांचे वाटप करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रा. डॉ. श्री हणमंत संपतराव पोळ आणि आणि प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय श्री गजानन लंबाते ( घोरपडवाडी), संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री विठ्ठल (नाना) पवार, माननीय श्री शिवाजीराव (बापू) पोळ, माननीय पिंटू निगडे, माननीय रणजीत रासकर, माननीय गोपाळ रासकर, माननीय महेश रासकर उपस्थित होते.
माननीय नामदार श्री भरणे माम यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते माननीय श्री पिंटू निगडे यांनी इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार व यांचे वाटप विद्यार्थ्यांना केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी मंत्री महोदयांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आणि विद्यालयास केलेली मदत याचा आवर्जून उल्लेख केला. भरणे मामांनी खूप मोठी मदत केली, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माननीय गजानन लंबाते, माननीय गोपाळ रासकर, माननीय रणजीत रासकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधाकर भोग सर यांनी केले, तर सर्वांचे आभार माननीय मुख्याध्यापक श्री शिरसट सर यांनी केले.


