महाराष्ट्राच राजकीय चित्र बदलणार..? पुन्हा ठाकरे सरकार येणार , मुंबईतल्या बॅनरनं सर्वांच लक्ष वेधलं..!


महाराष्ट्राच राजकीय चित्र बदलणार..? पुन्हा ठाकरे सरकार येणार , मुंबईतल्या बॅनरनं सर्वांच लक्ष वेधलं..!
[ महाशाही न्यूज मराठी ]
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे सूर जुळणार का ? अशी चर्चा सध्या  जोरदार सुरू आहे. कारण दादरच्या शिवसेना भवन परिसरात एक बॅनर लावण्यात आला असल्यामुळे  पुन्हा ठाकरे सरकार येणार असा आशावाद ही व्यक्त केला जात आहे.
या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय आणि या बॅनरमुळे राजकीय क्षेत्रात वेगवेगळे राजकीय अर्थ ही लावले जात आहेत.

दादरच्या शिवसेना भवनासमोर लागलेल्या या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चागलीच चर्चा सुरु  आहे.कारण त्या बँनरवर लिहलय की महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेंचं सरकार येणार..? हा आशावाद देखील व्यक्त केला आहे.


हे बँनर झळकावणारे शिवसेना ( उ.बा.ठा ) ठाकरे पक्षाचे शिवसैनिक फक्त बॅनर लावून थांबले नाहीत. या बॅनरवर जाहिर केलेली इच्छा पूर्णवहावी म्हणून गुवाहाटीला जावून कामाख्या देवीला साकडं ही घालणार असल्याचेही म्हटले आहे. कामाख्यादेवी च्या आशिर्वादानं काही राजकीय चमत्कार होतायेत का ? हे लवकरच कळेलच.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...