योगदिनानिमित्त लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतले योग प्रशिक्षणाचे धडे..



योगदिनानिमित्त लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतले योग प्रशिक्षणाचे धडे..

महाशाही न्यूज मराठी  :- गणेश धनवडे 
 २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून ओळखला जातो. शरीर,मन आणि आत्मा यांना एकत्रित आणून मोक्षाची किंवा मनःशांती ची अत्युच्च पातळी गाठणे म्हणजे 'योग ' अशी योगाची आधुनिक व्याख्या केली जाते. योग मानवजातीसाठी मोठे वरदान आहे.


"योग करेगा भारत, स्वस्थ रहेगा भारत" योगा चे जनक महर्षी पतंजली यांच्या कडून मिळालेल्या हा अनमोल ठेवा जपून योग साधना केली पाहिजे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात व जगाभारात योगसाधनेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेला योगाभ्यास आता “आंतरराष्ट्रीय योग दिवस” औचित्याने जगभरात अधिकृत रित्या मान्यताप्राप्त झाला आहे.सध्याच्या धावपळीच्या युगात उत्तम आरोग्यासाठी योगा प्राणायाम आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक विकास होणे आवश्यक आहे.


यासाठी लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय बोराटवाडी मध्ये आंतरराष्ट्रीय योगगुरू श्री.ऋतेश कवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योगासने प्राणायाम यांचे धडे अभ्यासून प्रात्यक्षिक करून दाखविले.


यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.भिमराव आवारे सर शिक्षक वृंद उपस्थित होते. त्यांनी ही विद्यार्थ्यांसमवेत योग प्राणायाम यांचा आनंद घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा शिक्षक श्री.सदाशिव सावंत सर यांनी तर आभार श्री. चंद्रशेखर काळे  सर यांनी  केले.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...