हिंदी अध्यापक संघ इंदापूर तहसील नवीन कार्यकारणी स्थापन ...
महाशाही न्यूज मराठी :- गणेश धनवडे
महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ सदस्य श्री उस्मान मुलांनी सर, पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघ सदस्य श्री राजेंद्र रणमोडे सर, पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघ समन्वयक श्री. सुधाकर भोंग सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच उपस्थित कार्यकारणी सदस्यांच्या सहविचारातून नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
बुधवार, दि. 11 जून 2025 रोजी श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव - केतकी येथे कार्यकारणी सभा संपन्न झाली. सदर सभेत मागील वर्षीच्या कार्याबद्दल आढावा घेण्यात आला. तसेच माझी अध्यक्ष श्री. शत्रुघ्न कानगुडे सर यांना निरोप देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघ सदस्य श्री उस्मान मुलांनी सर, पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघ सदस्य श्री राजेंद्र रणमोडे सर, पुणे जिल्हा हिंदी अध्यापक संघ समन्वयक श्री. सुधाकर भोंग सर यांच्या मार्गदर्शनाने तसेच उपस्थित कार्यकारणी सदस्यांच्या सहविचारातून नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
इंदापूर तहसील हिंदी अध्यापक संघाचे माजी सचिव तसेच मागील 30 वर्षापासून हिंदी विषयाची सेवा करणारे श्री. किसन धोंडीबा भोंग, श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव-केतकी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्री. दीपक जगन्नाथ निंबाळकर, श्री छत्रपती हायस्कूल, भवानीनगर यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी श्री दत्तात्रय विठ्ठल वाघ, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, अंथूर्णे यांची निवड करण्यात आली. सचिव पदी श्री. संजीवकुमार अर्जुन पांढरे, श्री काटेश्वर विद्यालय काटी यांची निवड करण्यात आली.
तसेच कार्यकारणी मध्ये नवीन सदस्य निवड करण्यात आली. यामध्ये श्री. मीनानाथ कौटी, श्री. शहंशाह मुजावर, सौ.एस.एन. गायकवाड, सौ. वर्षाराणी गाडे, श्री.शंकर रणमोडे यांची निवड करण्यात आली.