पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस 95 हजारांची लाच घेताना अटक धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ...


पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस 95 हजारांची लाच घेताना अटक धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ...


महाशाही न्यूज मराठी  :- धाराशिव प्रतिनिधी 
दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत 95 हजार रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचप (bribe) प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली आहे .सदर प्रकरणी पोलिसांवर (आरोपी) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


धाराशिव (Dharashiv) ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल 306 अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. 

त्यानुसार 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंति 95 हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. परंतु , तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. त्यात, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.




Popular posts from this blog

बार्शी सोलापूर रोडवर , कार आणि टू व्हीलर चा भीषण अपघात ; टूव्हीलर स्वार तरुणाचा मृत्यू..!

या वर्षी आषाढी वारी 2025 ची विठ्ठलाची महापूजा, फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली ; उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी..

माध्यमिक विद्यालय तावशीच्या मुख्याध्यापक पदी महादेव बागल..