बार्शीत सोलापूर रोडवर क्रेनच्या धडकेत 60 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू...
मिळालेल्या माहितीनुसार सदर घटनेत भगवान कोंडलकर हे सोलापूर रोडवरून पायी चालत असताना त्यांना एका क्रेनची जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच बार्शी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
सदर क्रेनचालकाविरुद्ध बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून क्रेन ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.


