रायगडावर 352 वा , शिवराज्याभिषेक सोहळा ; उत्साहात संपन्न..!


रायगडावर 352 वा , शिवराज्याभिषेक सोहळा ; उत्साहात संपन्न..!
महाशाही न्यूज मराठी  :- परशुराम राऊत 
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताश्याचा गजर, मंत्रोच्यार आणि शंखानाद, शिवरायांच्या गजरात किल्ले रायगडावर हा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील 80 हजारहून अधिक शिवभक्त गडावर हजेरी लावली होती.



किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती आणि शहाजी राजे , मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, कोकण विभागाचे पोलीस विशेष महानिरीक्षक संजय दराडे, पोलीस अधिक्षक आंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी. यावेळी उपस्थित होते.


या सोहळ्याची सुरवात गुरुवारी दुपारी गडपुजनाने झाली. रायगड खोऱ्यातील 21 गावातील नागरीकांनी एकत्र येऊन गडपुजन केले. त्यानंतर शिरकाई देवी मंदिरात गोंधळ आणि जगदिश्वर मंदिरात किर्तन सोहळा  झाला. विवीध भागातून आलेल्या शिवभक्तांनी होळीच्या माळावर मर्दानी खेळांचे सादरीकरण करत शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. तसेच रात्री शाहिरांनी पोवाडे सादर केले.


नंतर शुक्रवारी सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रम झाला. पहाटे नगारखाना परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राज सदरेवर शाहिरांनी महाराजांना मानवंदना दिली. सकाळी 10/30 च्या दरम्यान छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. व  मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या सिहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. 


सेच शिवाजी महाराजांच्या पालखीतील मुर्तीला पंचामृत, सप्तगंगा स्नान घालण्यात आले. आणि शिवआरतीचे पठण करण्यात आले.

रायगड पोलीस दलाच्या वतीने महाराजांच्या पुतळ्याला सश्रस्त्र मानवंदना देण्यात आली.  महाराजांच्या पालखीची शाही मिरवणूक काढण्यात आली. सोहळ्या निमित्ताने गडावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती.

या सोहळ्यात लाखो शिवभक्त नागरीक , महिला पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शंखनाद आणि तुतारीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने रायगडचा परिसर दुमदुमून गेला होता. राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी पारंपारीक वेषात मैदानी खेळांची, शस्त्र कवायतीचे सादरीकरण केले. पालखी सोहळ्यानंतर झालेल्या महाप्रसादाने सोहळ्याचा समारोप झाला.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...