सरकारला हात जोडून विनंती करतो, राज्यातील 25 किल्ले दत्तक द्या....छत्रपती संभाजी राजे यांची मागणी..
[ महाशाही न्यूज मराठी ]
सरकारला हात जोडून विनंती करतो की , राज्यातील 25 किल्ले मला दत्तक द्या... राज्याभिषेक सोहळ्या दरम्यान छत्रपती संभाजी राजे यांनी मागणी केली.तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की हा शिवाजी महाराजांचा शिवभक्त वारसदार आपले वेगळेपण दाखवून देईल, असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महाेत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी ते बोलत होते. यासाठी मला एक पैसाही देऊ नका. ते आम्ही उभे करू. अशक्य ते शक्य करण्याची धमक या संभाजी छत्रपतीमध्ये आहे, असाही दावा त्यांनी केला. व ते म्हणाले, राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा. सध्याच्या स्थितीत दहशतवाद वाढू लागला आहे, महिलांवर अन्याय होऊ लागले आहेत, जातीयवाद वाढत आहे.
अशा परिस्थितीत अभ्यासक्रमामध्ये शिवरायांच्या गाथेचा समावेश झाला पाहिजे. या रायगडावर महाराजांना शोभणाऱ्याच गोष्टी राहतील. जिल्हा प्रशासन आणि शिवभक्तांचे आभार मानत असताना संभाजीराजे यांनी आपण पुढच्यावर्षी तुमच्यासोबत तंबूत राहणार असल्याचे सांगितले.


