बार्शी येथील हर्ष योगेश शर्मा वय 13 वर्षे आज सकाळ पासून बेपत्ता आहे आढळल्यास बार्शी पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे अहवाहन..


बार्शी येथील हर्ष योगेश शर्मा वय 13 वर्षे आज सकाळ पासून बेपत्ता आहे आढळल्यास बार्शी पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे अहवाहन..
[ महाशाही न्यूज मराठी ]
बार्शी येथील मल्लीकार्जुन मंदिराजवळील देशमुख प्लॉट मध्ये राहणारा हर्ष योगेश शर्मा वय 13 वर्षे  या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी 6/30 वाजण्याच्या सुमारास हर्ष हा सायकल खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. परंतु बराच  वेळ झाला तरी तो घरी परत न आल्यामुळे त्याचे वडील योगेश शर्मा वय 41 वर्षे  यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली, परंतु हर्षचा थांगपत्ता लागला नाही.  



शेवटी योगेश शर्मा यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सादर प्रकरणी भा.दं.वि. कलम 137        ( 2 ) अंतर्गत गुन्हा क्रमांक 495 /2025  दाखल करण्यात आला आहे. हर्षचा रंग गोरा, उंची 135 सेमी, बांधा सडपातळ, केस काळे, डोळे मध्यम, डाव्या अंगठ्यावर तीळ असून, त्याने निळा टी-शर्ट आणि निळी पेंट परिधान केली होती. तो हिंदी, मराठी आणि मारवाडी भाषा बोलतो.  

बार्शी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रदीप झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पोलिसांनी सर्व ठाण्यांना शोध पत्रीका पाठवली असून, नागरिकांना हर्षबाबत माहिती असल्यास तातडीने बार्शी शहर पोलीस ठाणे ( 02184 -223333 ) किंवा तपासी अंमलदार  9326861799  यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...