भुजबळांना दिलेली मंत्रिमंडळातील एंट्री ही,नाराजीच राजकारण की OBC च समीकरण ...
महाराष्ट्रच्या कॅबिनेटमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आज झालेल्या राजभवनातील समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. पाच महिन्यांपूर्वी महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आल्यानंतर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. तेंव्हापासून ते नाराजच होते. त्याबद्दलची नाराजी त्यांनी अनेकदा बोलून ही दाखवली होती. बहुधा आता ती नाराजी दूर करण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर ओबीसीच गणित घट्ट करण्यासाठी की त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली आहे की काय ? याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
महायुतीचे सरकार सत्तेवर आले. तेव्हा 33 कॅबिनेट आणि 6 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश होता. मंत्रिमंडळामध्ये एकूण 42 जण होते. कॅबिनेटमध्ये 43 मंत्री शपथ घेऊ शकतात. परंतु एक जागा रिक्त ठेवण्यात आली होती. फडणवीस यांच्या सरकारमध्ये भाजपाचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादीचे 9 मंत्री सहभागी झाले होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर एक मंत्री पद रिक्त झाले. त्या जागेवर आता भुजबळ त्या पदावर घेतले आहे. या माध्यमातून ओबीसी समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न उघडच दिसतोय .
छगन भुजबळ हे आजपासू कॅबिनेटमध्ये सहभागी झाले आहेत . त्यांच्याकडे अन्नधान्य पुरवठा खात्याचा भार सोपवण्यात आला आहे. पूर्वी हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे होते.
छगन भुजबळ यांना ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा मानला जातो . त्यांनी राज्यातील अनेक प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. काही वर्षापूर्वी ते शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्या सोबत उभे राहिले होते. डिसेंबर 2024 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळाच्या विस्तारात त्यांना स्थान देण्यात आले नव्हते. त्यावेळी त्यांनी नाराज व्यक्त केलीहोती . आता पाच महिन्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.
मंत्री पद येते आणि जाते. पण मला कोणी संपवू शकत नाही, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या कडे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. छगन भुजबळ यांची नाराजी ही कधी ना कधी अंगलट येईल हे सर्वांच्या लक्षात येते होतं. त्यांना एक ओबीसी चेहरा हवा होताच. आणि सहाजिकच धनंजय मुंडे यांच्या राजीनामामुळे भुजबळांना संधी देण्यात आली.
ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगले अशी प्रतिक्रिया भुजबळांनी माध्यम शी बोलताना दिली. तर ओबीसी समाजाला जवळ करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली आल्याची चर्चा कानी पडत आहे.