निमसाखर व शिरसाटवाडीच्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी एल्गार...


निमसाखर व शिरसाटवाडीच्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी एल्गार...
महाशाही न्यूज मराठी :- गणेश धनवडे 
निमसाखर व शिरसाटवाडी ता इंदापूर जि पूणे शेतकऱ्यांचा पाण्यासाठी एल्गार निमसाखर ता इंदापूर जि पूणे आज सकाळी 54 फाट्याचे बंंद केलेले उन्हळी आवर्तन परत सुरु करण्यासाठी मराठी शाळा कांरडेवस्ती येथे आचानक मिटिंग  घेण्यात आली यावेळी निमसाखर, रणगाव,हागारेवाडी,शिरसटवाडी येथील शेतकरी उपस्थित होते या बैठकीत सर्व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग निमगाव येथे जाण्याचे ठरले .


निमगाव येथे उपविभागीय अभियंता निमगाव केतकी यांना सर्वांनी घेराव घातला व कार्यकारी आभियंता पुणे यांच्याशी फोनवरून पाणी बंद का केले यांची विचारणा करण्यात आली.
 

54 फाट्यावरील युवक शेतकऱ्यांच्या येवढ्या भावना तीव्र होत्या की साहेबाला उचलून गाडीत घालुन घेऊन जाऊन   फाटा सुरु करण्याचे ठरले व तशी कृती पण केली पण यावेळी साहेब मागील दाराने पळुन गेले परत जेष्ठ मार्गदर्शक मंडळी च्या सांगण्या नुसार व कार्यकारी आभियंता पुणे यांच्या फोनवरून चर्चे मधुन दि.14 ला परत 54 चे बंद केलेले पाणी सुरु करु असे सांगितले व तसे पञ घेण्यात आले व जर दिनांक 14 ला पाणी नाही सुटले तर दिनांक 15/5/25 ला सकाळी 54 फाटा येथे सर्व शेतकऱ्यांनी मिळुन लोकशाही मार्गाने रस्त्या रोको करण्याचे ठरले


Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...