इंदापूर शहरातील पहिली महिला एम.एस. सर्जन डॉ. भाग्यश्री महादेव चव्हाण यांचा शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गौरव


इंदापूर शहरातील पहिली महिला एम.एस. सर्जन डॉ. भाग्यश्री महादेव चव्हाण यांचा शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गौरव
महाशाही न्यूज मराठी  :- गणेश धनवडे 
इंदापूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या डॉ. भाग्यश्री महादेव चव्हाण यांचा विशेष गौरव समारंभ शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अल्फा बाईटच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला २०० हून अधिक विद्यार्थी, पालक, नागरिक आणि संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी मा. अजिंक्य खरात साहेब उपस्थित होते. त्यांनी डॉ. भाग्यश्रीच्या कार्याचा गौरव करताना सांगितले,
"ग्रामीण भागातील मुलींनी असे यश मिळवणे हे प्रेरणादायी आहे. भाग्यश्रीने वैद्यकीय क्षेत्रात केलेली वाटचाल ही इतर विद्यार्थ्यांना दिशा दाखवणारी आहे. त्यांच्या यशामागे चिकाटी, अभ्यास आणि पालकांचे मोलाचे संस्कार आहेत."

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर यांनी आपल्या भाषणात म्हटले,
"डॉ. भाग्यश्री चव्हाण यांसारख्या विद्यार्थिनींचा सन्मान करणे ही एक महत्वपूर्ण बाब आहे. त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्ये नवीन उर्मी निर्माण होते. ग्रामीण भागातील तरुण-तरुणींकडे अमर्याद शक्यता आहेत, त्यांना योग्य दिशा मिळाली पाहिजे."

डॉ. भाग्यश्री या शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदापूर चे प्रमुख महादेव चव्हाण सर आणि वैशाली चव्हाण मॅडम (शिक्षिका) यांची कन्या असून, त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण अत्यंत काटेकोर आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने पूर्ण करत एम.एस. सर्जन ही पदवी संपादन केली आहे.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांनी सांगितले कि,
"डॉ. भाग्यश्री चव्हाण यांचे यश म्हणजे इंदापूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवरील उन्नतीचा प्रतीक आहे. अशा मुलींचा सन्मान केल्याने नव्या पिढीला प्रेरणा मिळते."

या कार्यक्रमास संस्थेचे आरोग्य केंद्र विभागाचे प्रमुख श्री. महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख श्री. भारत बोराटे, संस्थेचे कार्यकर्ते श्री. हमीदभाई अत्तार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...