कुरवली ता. इंदापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन...
महाशाही न्यूज मराठी :- रणवरे संभाजी
कुरवली ता. इंदापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन उपसरपंच मंदा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
कुरवली ता. इंदापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन उपसरपंच मंदा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
कुरवली ता. इंदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त महिलाचा सन्मान करताना उपस्थित मान्यवर
यावेळी ग्रामपंचायत यांच्या वतीने आरोग्य परिचर वंदना अनिल पांढरे व अंगणवाडी मदतनीस सविता मोहन साळुंखे यांना राजमाता अहिल्यादेवी होळकर सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.याप्रसंगी येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणा देत जयघोष करण्यात आला.
अभिवादन प्रसंगी कुरवली विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन गणेश पांढरे,कै.आण्णासाहेब पांढरे सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष दिनेश पांढरे, शिवशंकर पाणीवापर संस्था चेअरमन मोहन रणमोडे ,ग्रामपंचायत सदस्य विजयकुमार पांढरे,शिवाजी चव्हाण,संतोष कदम, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पांढरे, योगेश माने , सुभाष पांढरे, भिकुदास पांढरे, विजय चव्हाण,नितीन पांढरे,अक्षय पांढरे,रमजान सय्यद,सतिश पांढरे,शंकर थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी गायकवाड ,संजय गायकवाड इ मान्यवर उपस्थित होते.



