पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या दुधाच्या टॅंकर मधील महीला व तिचा मुलगा पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप..
पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या दुधाच्या टॅंकर मधील महीला व तिचा मुलगा पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप..
रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कळंब तालुका इंदापूर ( इंदापूर ) आणि चिखली च्या मध्ये बारामती बाजूकडून अकलूज कडे जाणारे पुलावरून व पुलाच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते त्या प्रवाहात दुधाचा टँकर अडकला होता.
त्यामध्ये एक महिला सुनिता सिकंदर साठे वय 38 वर्षे व तीचा मुलगा कार्तिक सिकंदर साठे वय 10 वर्षे रा.अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर आणि सदर टँकरचा चालक व कळंब येथील तानाजी कदम, अमोल डोंबळे व सोमनाथ जमदाडे हे सर्वजण त्यामध्ये आडकले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशन चे पोलिस हवालदार महेश पवार, विकास निर्मळ, हरिश्चंद्र जगताप यांनी सर्वांनी मिळून त्यांना सुखरूप बाहेर काढले पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.


