रघोजी किडनी हाॅस्पिटल सोलापूर
प्रति,
डाॅक्टर गजानन पिलगुलवार सर ,
रघोजी किडनी हाॅस्पिटल सोलापूर..
माझी किडनी चोकप झाली होती Serum Creatinine 8 होते लघवी होत नव्हती मला बार्शी येथील सुविधा हाॅस्पिटल मधून सोलापूरला जाण्यास सांगितले होते तेंव्हा माझ्या मुलास बार्शी येथील एका गणपती मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले की गजानन सर्व काही ठीक करेल काळजी करू नका ? मी बेशुद्ध अवस्थेत होतो मला आपल्या सोलापूर येथील रघोजी किडनी हाॅस्पिटल येथे नोव्हेंबर 2024 ला ॲम्बुलन्स व्हॅन मध्ये आणून ऍडमिट करण्यात आले होते.
साधारणतः मी एक महिना आपल्या हाॅस्पिटल मध्ये होतो. आपल्या हाॅस्पिटल मध्ये आपन फक्त एकदाच माझे डायलेसिस केले त्यानंतर मला डायलेसिस ची गरज भासली नाही आता माझी किडनी एकदम व्यवस्थित झाली आहे तसेच लघवी ही व्यवस्थित होते. औषध गोळ्या वगैरे काही नाही सर्व बंद आहे तुमच्या कुशलतेमुळे आणि तुम्ही केलेल्या अथक परिश्रमामुळे मी आज पूर्णपणे निरोगी आहे. आपल्या नावातच सर गणपती बाप्पा आहे डाॅक्टर गजानन पिलगुलवार सर [ गणपती बप्पा ] तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.. आणि आपल्या कार्याला सलाम सर..!
परशुराम राऊत येरमाळा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद पेशंट क्रमांक 90844

