इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा प्रचार शिगेला...


इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा प्रचार शिगेला... 
महाशाही न्यूज मराठी  :- गणेश धनवडे 
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे, ही निवडणूक सभासदांनी हातात घेतलेली असून कार्यक्षेत्रातील निमसाखर गावातील सभासद  प्रताप बापू कदम, जयंत मोरे,विकास बापू रणसिंग, हर्षल रणवरे , रवि पवार आदींनी सभासदांच्या घरोघरी जाऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज बापू जाचक यांच्या जय भवानीमाता पॅनलला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.


यावेळी सभासदांनी आपल्या ऊस तोडणी, दराच्या संदर्भात भेदभाव, सहकारी चळवळ वाचावी, शेतीच्या पाण्याचा प्रश्न तसचे कार्यक्षेत्रातील नदीच्या भागातील रस्ते दुरुस्त व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


अनेक सभासदांनी बापू यांच्या कार्यकाळात राज्यात क्रमांक एकचा दर मिळाला होता याची आठवण करून दिली, पृथ्वीराज बापू जाचक यांच्याकडे कारखाना गेल्यानंतर गतवैभव प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...