पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी. मधील कनिष्ठ लिपिक मा . श्री भागवत बबन पोळ सेवापूर्ती कार्यक्रम उत्साहात साजरा..


पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी. मधील कनिष्ठ लिपिक मा . श्री भागवत बबन पोळ सेवापूर्ती कार्यक्रम उत्साहात साजरा..
महाशाही न्यूज मराठी  :- रणवरे संभाजी 
आज शनिवार दिनांक 31 मे 2025 रोजी नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटी, निरवांगी चे पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी. मधील कनिष्ठ लिपिक मा . श्री भागवत बबन पोळ हे नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत., त्यानिमित्ताने आज विद्यालयात छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री विठ्ठल (नाना) पवार, सचिव माननीय पांडुरंग भानुदास पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री  शिरसट सर, श्री भोंग सर, श्री गावडे सर, स्वप्निल पोळ सर, सौ. भोसले मॅडम, जाधव सर, श्री दणाने डी. एस., श्री मोहन रोकडे उपस्थित होते.


या कार्यक्रमात सत्कारमूर्ती माननीय श्री भागवत बबन यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री विठ्ठल पवार आणि संस्थेचे सचिव माननीय श्री पांडुरंग पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार केला.
यावेळी अनेक सहकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आपल्या आठवणी व्यक्त केल्या, आज पर्यंत केलेले काम आणि केलेले मार्गदर्शन हे सर्वांनी आवर्जून आठवणीत सांगितले. सत्कारमूर्ती  भागवत बबन पोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला आणि सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

संस्थेचे सचिव यांनी आपले विचार व्यक्त केले, त्यांनी सांगितले की श्री भागवत पोळ यांनी चांगले काम केले आहे, त्यांना चांगला अनुभव होता, त्या अनुभवाचा फायदा शाळेला झाला. संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री विठ्ठल पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यांनी सांगितले की भागवत पोळ यांनी खूप चांगले काम केले, सर्वांना सहकार्य केले, कोणतेही काम वेळेत करणे हे महत्त्वाचे असते, असे जबाबदारी पार पाडली.

शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी आपले विचार व्यक्त केले, त्यांनी सांगितले की, भागवत पोळ यांनी उत्कृष्ट काम केले आहे, फक्त हे काम अचूक आणि वेळेत करणे हेच कामाचे वैशिष्ट्य होते. यावेळी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. आलेल्या सर्व पाहुण्यांचे सरांनी आभार व्यक्त करून श्री भागवत पोळ यांच्या सेवानिवृत्ती बद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या आणि सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा सुखाचा, समृद्धीचा, आणि निरोगी आयुष्याच्या जावो ही सदिच्छा व्यक्त केली.
    
नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटी, चे संस्थापक_ अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री हणमंत संपतराव पोळ, संस्थेचे सर्व माननीय पदाधिकारी यांनी श्री भागवत बबन पोळ यांना सेवानिवृत्तीबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचा काळ हा आनंदाचा, सुखाचा, ऐश्वर्याचा आणि निरोगी आयुष्याचा जावो अशी सदिच्छा व्यक्त केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचा समारोप विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री शिरसट सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून आणि सर्वांना चहापाणी करून सर्वांना निरोप दिला, सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...