आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी व समाजहितासाठी काम करत राहीन - स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग,



आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी व समाजहितासाठी काम करत राहीन - स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग, रणसिंग यांच्या पुण्यतिथी निमित्त डॉ.हमीद काझी यांनी दिला स्मृतीना उजाळा..
महाशाही न्यूज मराठी  :- रणवरे संभाजी 
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे  संस्थापक अध्यक्ष  
स्वर्गीय विश्वासराव कृष्णाजी रणसिंग यांच्या स्मृतिदिननिमित्त संस्थेचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता.इंदापूर येथे पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. 


रणसिंग यांच्या प्रतिमेचे पुजन सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.हमीद काझी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्था उपाध्यक्ष यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश बापू कदम, सचिव वीरसिंह रणसिंग,विश्वस्त शंकरराव रणसिंग,प्राचार्य डॉ विजय केसकर, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग प्रतिमेचे पुजन करीत अभिवादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय केसकर यांनी सन १९८० पासून संस्था सामाजिक व शैक्षणिक कार्यात योगदान देत असून परिसरात संस्था व महाविद्यालयाने नावलौकिक मिळवला असल्याचे सांगितले.


    स्वर्गीय विश्वासराव रणसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन प्रसंगी उपस्थित मान्यवर....

प्रमुख वक्ते डॉ.हमीद काझी यांनी विश्वासराव रणसिंग दादांच्या आठवणींना उजाळा दिला. रणसिंग दादा यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वसापर्यत समाज व शेतकरी हितासाठी काम करणार असल्याची नेहमी सांगत असल्याची आठवण काझी यांनी सांगितली.त्यांचे राजकीय सामाजिक संबंध ,कलाप्रेमी व्यक्तीमत्व ,शेतकरी हितासाठी पाण्यासाठी निमगाव केतकी येथील बैलगाडी ऱॅली व रस्ता रोको आंदोलन,निमसाखर येथील उपोषण,राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती देत त्यांच्या विचाराचा वारसा पुत्र विरसिंह रणसिंग समर्थपणे चालवत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विरसिंह रणसिंग यांनी दादांच्या विचारांना अभिवादन करून रणसिंग कुटुंबीयांबद्दल प्रेम असणाऱ्या सर्व घटकांचे आभार व्यक्त करीत वडिलांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेची वाटचाल यशस्वीपणे सुरु असल्याचे सांगितले. प्रास्ताविक क्रिडा संचालक सुहास भैरट व आभार प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...