निमसाखर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी...
निमसाखर ता इंदापूर येथे निमसाखर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी निमसाखर ग्रामपंचायतचे सरपंच मा. श्री धैर्यशील विजय रणवरे-पाटील व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ निमसाखर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन निमसाखर ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच मा श्री धैर्यशील विजय रणवरे पाटील यांच्या हस्ते झाले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीचे औचित्य साधून निमसाखर ग्रामपंचायतच्या वतीने अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गावातील कर्तुत्ववान स्त्रियांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये संगीता संभाजी रणवरे, मोनिका सचिन पवार, नीता विशाल माने, जयश्री उत्तम अडसूळ, दिपाली जितेंद्र भोसले या महिलांचा समावेश होता..
सदर कार्यक्रम प्रसंगी निमसाखर ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..



