वाहनमालकांनी 15 दिवसात संपर्क साधावा...अन्यथा बेवारस वाहनांचा होणार लिलाव..!


वाहनमालकांनी 15 दिवसात संपर्क साधावा...अन्यथा
बेवारस वाहनांचा होणार लिलाव..!
महाशाही न्यूज मराठी बार्शी 
बार्शी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली बेवारस वाहने ऑटो रिक्षा , दुचाकी  आणि इतर वाहनांच्या  मालकांनी आपआपली योग्य कागदपत्रे सादर करून तसेच नियमानुसार जी असेल ती शुल्क भरून आपली वाहने 15 दिवसांच्या आत पोलीस ठाण्यातून घेऊन जावीत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


या संदर्भात अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी सांगितले की, बेवारस वाहनांची यादी पोलीस ठाणेआणि तहसील कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. त्यानुसार  वाहनमालकांनी आवश्यक कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात रीतसर अर्ज सादर करून आपले वाहन आसल्याचा पुरावा सादर करून वाहन घेऊन जावे.

जर 15 मे 2025 पर्यंत ज्या वाहनांवर कोणीही हक्क सांगितला नाही, तर शासकीय नियमानुसार या वाहनांचा लिलाव करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सदरील बेवारस वाहनांबाबत अधिक माहितीसाठी बार्शी शहर पोलिस ठाणे [ 02184 - 2222333 ] पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे [ मो. नं. 9503785090 ] आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कदम [ मो. नं. 8669502296 ] यांच्याशी संपर्क साधवा .

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...