कार्यक्रम आटोपून परतताना भिषण अपघात ट्रक ट्रेलर धडक 13 जणांचा मृत्यू अनेक जखमी.!
[ महाशाही न्यूज मराठी ]
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये बालोदाबाजार रस्त्यावर सारागावजवळ ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला या अपघातात 13 जणांचा म़त्यू झाल्याची घटना घडली . रविवारी रात्री उशीरा हा अपघात झाला. यामध्ये एका सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या अपघातात चार मुले व 9 महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व जखमींना रायपूरच्या डॉ भीमराव आंबेडकर रुग्णालयात तातडीने नेण्यात आले. या अपघातात साधारण 13 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून म़ृतदेह ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


