वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल, 10 एकर जमीन हडपण्यासाठी केला घोटाळा
[ महाशाही न्यूज मराठी पुणे ]
जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुणे येथील चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून फौजदारीपात्र रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता एक बनावट महिला उभी करून ती मूळ जमिनीची मालकीण असल्याचे भासविण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पुणे येथील एक बांधकाम व्यावसायिकाचा देखील या प्रकरणाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. 1 ) आनंद लालासाहेब भगत, 2 ) शैलेश सदाशिव ठोंबरे, 3 ) राजेंद्र लांडगे, 4 )अपर्णा यशपाल वर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
सदर प्रकरणी मिळाली माहिती अशी की चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी एक तपास पथक स्थापन केलं असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे संबंधित प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग असल्यामुळे पुणे पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.


