Solapur मोठी बातमी, सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण ; सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे ( माने ) या महिलेचे नाव..!
Solapur मोठी बातमी, सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण ; सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे ( माने ) या महिलेचे नाव..!
[ महाशाही न्यूज मराठी ]
सोलापुर येथील प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये मनीषा मुसळे-माने ही महीला प्रशासकीय अधिकारी म्हणून कामास आहे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, त्यामध्ये त्यांनी मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डॉ. वळसंगकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रांवरती हवे होते. त्यासाठी त्यांचा आग्रह होता, पण रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती, तिला डॉ. वळसंगकरांनी कामावरून देखील काढलं होतं. पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती. तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, डॉक्टरांना ते मान्य नव्हते. या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचे आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्री न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून डॉ. शिरीष वळसंगकर हे घरी परतले.त्यानंतर रात्री 8:30 वाजता बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. परत दुसरा राउंड फायर झाल्याचा आवाज ऐकल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात दिसले. रात्री 9 वाजता. त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले. मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यासह 5 तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. शेवटी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले. रात्री 10 / 30 वाजता पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील केले. रात्री 10 / 45 वा. फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक काडतूस, आणि रक्ताचे नमुने घेतले.