डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज बार्शी शहरात शांतता कमिटीची बैठक...
[ महाशाही न्यूज मराठी :- परशुराम राऊत ]
ही बैठक आज सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी येथे होणार आहे.
बार्शी शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी सांगितले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बार्शी शहरातील सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बंधू आणि नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
उत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी केली आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून शांतता कमिटीची बैठकीचे आज आयोजन करण्यात आली आहे.