सरकारच्या निर्णयाला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा तीव्र विरोध..!
मुंबई, दिनाक. 4 एप्रिल 2025 रोजी मंत्रालयातील पत्रकारांच्या दिवसभराच्या प्रवेशावर मर्यादा घालणाऱ्या राज्य सरकारच्या निर्णयाला आता डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेनेही तीव्र विरोध दर्शवला आहे. डिजिटल युगात लोकशाहीचं पहारक ठरलेल्या ऑनलाईन माध्यमांना रोखण्याचा हा प्रयत्न असून, हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचं संघटनेचं म्हणणे आहे.
संघटनेच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “डिजिटल मीडिया ही आजच्या घडीला सर्वात वेगवान आणि प्रभावी माध्यम आहे. मंत्रालयात होणाऱ्या घडामोडींची तात्काळ माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम डिजिटल पत्रकार करतात. अशा वेळी त्यांच्यावर मर्यादा घालणे म्हणजे माहितीचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे.”
संघटनेने या निर्णयाला ‘लोकशाहीविरोधी आणि पत्रकारविरोधी’ ठरवत त्याविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा इशारा दिला आहे. लवकरच विविध डिजिटल न्यूज पोर्टल्स आणि संपादक एकत्र येऊन एक सामूहिक कृती आराखडा जाहीर करणार आहेत.
संघटनेने स्पष्ट केले की, “ हा केवळ पत्रकारांचा नाही तर जनतेच्या माहितीच्या हक्काचा मुद्दा आहे. आम्ही हा अन्याय सहन करणार नाही.

