बार्शीत पहिल्यांदाच 'भगवंत भक्त विजय थोरात यांची ऐतिहासिक रचना "भगवंत भजनांजली " कार्यक्रमाचे आयोजन..!
बार्शीत पहिल्यांदाच 'भगवंत भक्त विजय थोरात यांची ऐतिहासिक रचना "भगवंत भजनांजली " कार्यक्रमाचे आयोजन..!
महाशाही न्यूज मराठी :- बार्शी
आपल्या ग्रामदैवतावर प्रेम करणारा आणि भक्तिरसात न्हालेला शहरातील एक अभ्यासू आणि समर्पित भगवंत भक्त विजय थोरात कोरे यांनी बार्शीच्या इतिहासात एक नवे पान लिहिले आहे. भगवंत मंदिराच्या इतिहासात प्रथमच त्यांच्या स्वरचित एकूण 19 रचना तयार करण्यात आल्या असून, या भजनांनी भाविक भक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
आई अरुणाबाई अंबादास थोरात आणि वारकरी आजोबांकडून लाभलेल्या भक्तीपर संस्कारांचा प्रभाव विजय थोरात यांच्या लेखणीवर स्पष्टपणे जाणवतो. संत साहित्य, अध्यात्म आणि भक्तिमार्ग यांचे बाळकडू लहानपणापासून मिळाल्यामुळे त्यांच्या रचनांमध्ये एक वेगळाच भावस्पर्श जाणवतो.
आई अरुणाबाई अंबादास थोरात आणि वारकरी आजोबांकडून लाभलेल्या भक्तीपर संस्कारांचा प्रभाव विजय थोरात यांच्या लेखणीवर स्पष्टपणे जाणवतो. संत साहित्य, अध्यात्म आणि भक्तिमार्ग यांचे बाळकडू लहानपणापासून मिळाल्यामुळे त्यांच्या रचनांमध्ये एक वेगळाच भावस्पर्श जाणवतो.

ऑटोमोबाईल्स उद्योगात यशस्वी व्यक्तिमत्व, डिजिटल मीडिया पत्रकार म्हणून कार्यरत असलेले पश्चिम महाराष्ट्र सहसचिव आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सोलापूर जिल्हा पीआरओ अशी विविध क्षेत्रात ओळख निर्माण केलेल्या विजय थोरात यांनी 2018 मध्ये ओंकार मंत्राच्या अनुष्ठानानंतर आपल्या लेखनाची सुरुवात केली. स्वामी समर्थ महाराज, गणपती, आई-वडील आणि अखेर भगवंत यांच्यावर त्यांनी मन:पूर्वक रचना साकारल्या.
काकड आरती, परंपरागत आरती, भगवंत भजन, भगवंत स्तुती, भगवंत महात्म्य आणि भगवंत मंत्र अशा विविध भक्तिरचना त्यांनी साकारल्या आहेत. आज मंदिरात ऐकू येणारा भगवंत मंत्र त्यांच्याच आवाजात असून, तो ऐकून भाविक मंत्रमुग्ध होतात.
याच भक्तिभावपूर्ण परंपरेचा पुढचा टप्पा म्हणजे येणाऱ्या 5 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता भगवंत मंदिर, बार्शी येथे 'भगवंत भजनांजली' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विजय थोरात यांच्या स्वरचित रचनांचे सादरीकरण होणार असून, त्यांना साथ देणार आहेत प्रसिद्ध तबलावादक ऋषिकेश गोंदील आणि ख्यातनाम हार्मोनियम वादक अण्णा खारे.
तसेच, विजय थोरात यांनी भगवंत जन्मोत्सवाच्या निमित्ताने तयार केलेल्या "भगवंत महात्म्य" या ग्रंथाचे लोकार्पण 8 मे रोजी सायंकाळी हरिभक्त परायण सद्गुरु डॉ. जयवंत बोधले महाराज यांच्या पावन हस्ते त्यांच्या प्रवचनाच्या दरम्यान होणार आहे.
विजय थोरात यांनी भाविकांना आवाहन केले आहे की, "या भजनांजली कार्यक्रमात उपस्थित राहून आपण आपल्या ग्रामदैवत भगवंताचे गुणगान करावे. ही केवळ एक सांस्कृतिक नाही तर अध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे." कारण बार्शीत घडणार आहे इतिहास, भक्तिरसात न्हालेल्या स्वरांचा संगम. या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन कुलकर्णी मॅडम करणार आहेत

