विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात महात्मा ज्योतीराव फुले जयंती साजरी...
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांच्या 197 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. विजय केसकर अध्यक्षस्थानी होते.
महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव व्हिडिओ क्लिप दाखवून करण्यात आला. व्हिडिओ क्लिपचे संयोजन प्राचार्य डॉ.विजय केसकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ.केसकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ.रामचंद्र पाखरे, डॉ प्रशांत शिंदे,प्रा.ज्योत्स्ना गायकवाड, डॉ.बबन साळवे, प्रा.सुनील सपकाळ, प्रा.राम कांबळे, प्रा.विनायक शिंदे, प्रा. प्राजक्ता सोनवणे, प्रा.स्नेहल जाधव यांनी पुष्प अर्पण करून महात्मा फुले यांना अभिवादन केले.
यावेळी प्राचार्य डॉ.विजय केसकर यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेऊन महात्मा फुले यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी मानले.



