चाळीसगाव रोड वर केळी वहातूक करणाऱ्या टेम्पो ट्रक चालकाकडून पन्नास रुपयाची लाच प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी आणि एक सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे निलंबन...
चाळीसगाव रोड वर केळी वहातूक करणाऱ्या टेम्पो ट्रक चालकाकडून पन्नास रुपयाची लाच प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी आणि एक सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे निलंबन...
[ महाशाही न्यूज मराठी ]
पाचोरा तालुक्यातील चाळीसगाव रस्त्यावर एका केळी वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रक ड्रायव्हर कडे पोलिस लाचेची मागणी करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच वायरल झाला आहे.
पाचोरा तालुक्यातील चाळीसगाव रस्त्यावर एका केळी वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रक ड्रायव्हर कडे पोलिस लाचेची मागणी करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच वायरल झाला आहे.
जळगाव मधील या प्रकरणामुळे तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामध्ये एका सहायक फौजदाराचा पण समावेश आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना पन्नास रूपयासाठी आपली नोकरी गमवावी लागली आहे. पोलिस खात्याला कलंकित करणारी घटना घडल्या मुळे चर्चेला उधाण आले आहे.
व्हिडिओमध्ये पोलीस टेम्पो ट्रक ड्रायव्हरला पाचशे रुपये ची मागणी करत असल्याचे दिसत आहे मात्र वाहन चालक पन्नास रुपये घेण्याची विनंती करत होता. शेवटी पोलीस कर्मचारी शंभर रुपये वर आला आम्ही सतत तुम्हाला पैसे देतोच की असे टेम्पो ट्रक ड्रायव्हर बोलत होता परंतु पोलिस कर्मचारी त्यास म्हणाला की पन्नास रुपये इतकी आमची इज्जत आहे का ? असे पोलीस कर्मचारी सुनावत होते. नाही होय करीत शेवटी पवन पाटील या पोलिस कर्मचाऱ्यांने पन्नास रुपये स्विकारले.
सदर प्रकरणी रविवारी पवन पाटील यांच्या वर तर सोमवारी हवालदार चेतन सोनवणे आणि सहाय्यक फौजदार गुलाब मनोरे यांचे निलंबन पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी काले.