बायपास येथील जुगार अड्ड्यावर छापा , रोख रक्कमेसह 6 जण ताब्यात ; बार्शी तालुका पोलीस ठाण्याची मोठी कारवाई..!


बायपास येथील जुगार अड्ड्यावर छापा , रोख रक्कमेसह 6 जण ताब्यात ; बार्शी तालुका पोलीस ठाण्याची मोठी कारवाई..!
महाशाही न्यूज मराठी बार्शी 
बार्शी तालुका पोलीस ठाण्यास गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार,बार्शी  तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या आदेशाने नागोबाची वाडी हद्दीतील गाडेगाव रोड, बायपास चौक या ठिकाणी चालू असलेल्या जुगार अड्डयावर रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. असता, सदर ठिकाणी काही लोक गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले.


यावेळी त्यांच्याकडे असलेले जुगार साहित्य 22 पानी पत्त्याचा डाव, रोख रक्कम हस्तगत करून 6 जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 [ अ ] प्रमाणे कार्यवाही करण्यात आली.

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांचा नेतृत्वाखाली तर पो. हे. कॉ. सोमनाथ खांडेकर, पो. हे. कॉ. बोबडे, पो. हे. कॉ. शेलार, पो. कॉ. चौधरी यांच्या पथकाने सदर कारवाई केली.

अशा प्रकारच्या कारवाईमुळे बार्शी शहर व तालुक्यातील जुगार खेळणाऱ्यांवर निश्चित आळा बसेल अशी चर्चा  सर्व स्तरातील नागरिकांतून कानी पडत आहे. 

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...