श्री भगवंत महोत्सवामध्ये , स्थानिक कलाकारांसाठी सुवर्णसंधी ; 22 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये होणार निवड !
श्री भगवंत महोत्सवामध्ये , स्थानिक कलाकारांसाठी सुवर्णसंधी ; 22 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये होणार निवड !
प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री भगवंत महोत्सवाचे आयोजन 4 मे 2025 ते 10 मे 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे.
या महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारांना वाव मिळावा म्हणून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी भगवंत मैदान येथे एक दिवशीय स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 22 एप्रिल रोजी, यशवंतराव चव्हाण संस्कृतीक सभागृह येथे सायंकाळी 5 ते 10 या वेळेमध्ये कलाकारांच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या कलाकारांनी वेळेवर उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भगवंत महोत्सव समितीमधील संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


