पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या कडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक मार्गाची पहाणी...
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या कडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक मार्गाची पहाणी...
[ महाशाही न्यूज मराठी ]
दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानिमीत्ताने बार्शीत मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यानिमीत्ताने बार्शीत मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
रस्त्यावरील खड्डे, विजेच्या खांबांवरील तारा, रस्त्यावर पडलेली वाळू, झाडांच्या अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. या अडथळ्यांचे तातडीने निराकरण करण्यात यावे यासाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला जात असल्याची माहिती यावेळी दिली.
मिरवणूक व जयंती उत्सव कोणत्याही अडथळ्याविना उत्साहात पार पडावा, यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून आवश्यक ती तयारी करण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, तहसीलदार एफ. आर. शेख, महावितरणचे अधिकारी तगारे, बार्शी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे तसेच मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे सदस्य उपस्थित होते.