सुर्डी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी [ DCC ] बँकेवर टाकलेल्या तीन दरोडेखोरांना बार्शी पोलिसांनी अवघ्या तासाभरात पिस्टलसह केले गजाआड...
सुर्डी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी [ DCC ] बँकेवर टाकलेल्या तीन दरोडेखोरांना बार्शी पोलिसांनी अवघ्या तासाभरात पिस्टलसह केले गजाआड...
या बाबतची सविस्तर माहिती अशी की ,बार्शी तालुक्यातील सुर्डी येथे शुक्रवार दिनांक 7 मार्च 2025 रोजी दुपारी 4/15 च्या दरम्यान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि .सोलापूर सुर्डी शाखेमध्ये अनोळखी 3 इसम अंदाजे 20 ते 25 वर्षे वयाची यांनी तोंडाला माकडटोपी घातलेली हातात कोयते आणि पिस्टल घेऊन धाडसी दरोडा टाकला.
आरोपींनी पिस्टल ने फायरींग करून दहशत माजवली
आणि बँक मॅनेजर यांना कोयत्याने मारहाण करून जखमी केले. बॅकेत असलेली 1 लाख 54 हजार 300 रूपये रोख रक्कम जबरदस्तीने लुटून आरोपी मोटरसायकलवरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जालिंदर नालकूल यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो.नि. दिलीप ढेरे यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने तात्काळ सुर्डी परिसरात आरोपींचा शोध सुरू केला. कासारवाडी ते रेल्वे फाटक, बार्शी या दरम्यान 3 इसम संशयास्पद हालचाल करत असल्याचे दिसले. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले.
चौकशीत आरोपींनी बँकेत जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून MADE IN USA चे एक पिस्टल, कोयता आणि लुटीतील ₹99,543/- रोख रक्कम जप्त करण्यात आली. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 75/25 भारतीय दंड संहिता कलम 311, 112, 3(5) व शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायालय, बार्शी येथे हजर करण्यात आले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.
सदर आरोपींपैकी एकावर यापूर्वी दंगलीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती असून, ही टोळी अतिशय धोकादायक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. उपविभागीय अधिकारी श्री. जालिंदर नालकूल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कार्यवाहीत प्रभारी अधिकारी सहा. पो.नि. दिलीप ढेरे, पो. उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस हवालदार अभय उंदरे, धनराज केकाण, पोलीस नाईक सागर शेंडगे, उत्तरेश्वर जाधव, सिध्देश्वर लोंढे, हनुमंत गवळी, युवराज गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
बार्शी तालुका पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या कामगिरीमुळे कौतुक होत आहे.



