लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी ता इंदापूर जि पूणे मध्ये आगळीवेगळी रंगपंचमी...


लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी ता इंदापूर जि पूणे मध्ये आगळीवेगळी रंगपंचमी...

महाशाही न्यूज मराठी:- गणेश धनवडे 
रंगपंचमी हा सण भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या सणाद्वारे लहान मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होते.


रंग खेळल्याने लहान मुलांचे मानसिक आरोग्य सुधारते. त्यांच्यातील ताण कमी होतो आणि ते आनंदी राहतात.रंगपंचमी हा सण लहान मुलांसाठी एक पर्वणीच आहे. रंग खेळल्याने लहान मुले खूप आनंदी होतात त्यांच्यातील नकारात्मक भावना कमी होतात.मुलांमधील मैत्री आणि बंधुभाव वाढतो. त्यांना रंगांची ओळख होते. ते रंगांच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता व्यक्त करतात. हाच दृष्टिकोन लक्षात घेऊन आज लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी मध्ये रंगाच्या रंगछटातून वेगवेगळे प्राणी,पक्षी, डिझाईन हाताच्या माध्यमातून साकारत रंगपंचमी साजरी करण्यात आली.



नुकत्याच झालेल्या रंगपंचमी सण व जागतिक चिमणी दिवस या दोन्ही चा मेळ घालत विद्यार्थ्यांना निसर्गाच्या जवळ आणण्याचा व पर्यावरणाचे रक्षण करण्याची जाणीव ही या उपक्रमाच्या माध्यमातून झाली.



विद्यालयाचे प्राचार्य श्री.भिमराव आवारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक श्री.नवनाथ कुंभार सर,श्री.अमर निलाखे सर ,श्री.सचिन भुजबळ सर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...