ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आज डिजिटल बोर्डचे उद्घाटन संपन्न...
ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आज डिजिटल बोर्डचे उद्घाटन संपन्न...
निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आज डिजिटल बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेचे आदरणीय चेअरमन राजेंद्र कुमार सूर्यकांत रणवरे व सन्माननीय सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे उपस्थित होते. हे डिजिटल बोर्ड आपल्याच विद्यालयातील माजी विद्यार्थी बापू नामदेव नांगरे तसेच आपल्या विद्यालयातील वरिष्ठ लिपिक बरकत डांगे यांच्या व इतर काही त्यांच्या मित्रांच्या चर्चेतून व सहकार्यातून व उर्मी संस्थेच्या सीएसआर फंडातून जवळपास पाच लाखापर्यंतचे तीन डिजिटल बोर्ड बसवण्यात आले.
याप्रसंगी स्वप्निल देशमुख साहेब ,संदीप जाधव, स्नेहल काळे ,पांडुरंग सुरवसे इत्यादी मान्यवरही उपस्थित होते. स्ट्रीमलॅंड मीडिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा यामध्ये अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. त्यावेळी बापूसाहेब नांगरे यांचे पिताश्री नामदेव निवृत्ती नांगरे यांच्या हस्ते डिजिटल बोर्ड चे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.
बापू नांगरे आपल्या भाषणात म्हणाले आज मला माझ्या एन ई एस हायस्कूल बद्दल सार्थ अभिमान वाटतो. इंदापूर तालुक्यातील एक नामवंत शैक्षणिक संस्था म्हणून माझ्या शाळेकडे पाहिले जाते. या शाळेतून शिक्षण घेतलेले आम्ही सर्व मित्र विविध क्षेत्रांमध्ये अग्रस्थानी कार्यरत आहोत. या पुढील काळात देखील विकास साठी व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संस्थेच्या आदरणीय चेअरमन राजेंद्र दादा यांनी उपस्थित मान्यवरांचे मनापासून कौतुक केले. आपण आमच्या संस्थेसाठी जी भरीव मदत केली त्यासाठी आम्ही सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी सर्व पंचक्रोशीतील पालक व विद्यार्थी मनापासून आभार मानतो. संस्था सचिव धनंजय भैया यांनी देखील आपला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य प्रिय आहे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत हितकारक आहे असे मत व्यक्त केले व सर्वांना धन्यवाद देऊन त्यांच्या आभार मानले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे सर यांनी केले. व आभार प्रदर्शन वैभव नारायण हणमंते सर यांनी केले.



