निमसाखर ता इंदापूर जि पुणे येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे पीर साहेब उरूस यात्रेची तयारी सुरू झाली...
निमसाखर ता इंदापूर जि पुणे येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे पीर साहेब उरूस यात्रेची तयारी सुरू झाली...
महाशाही न्यूज मराठी :- गणेश धनवडे
निमसाखर गावचे पीर साहेब देवस्थानचे मानकरी व तंटामुक्ती अध्यक्ष तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री. संतोष जयकुमार रणवरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रुढी व परंपरेनुसार चालत आलेली पीर साहेब उरूस यात्रा शनिवार दिनांक 22/3/2025 पासून सुरू होत असून निमसाखर व निमसाखर पंचक्रोशीतील हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी येत असतात.

शनिवार 22/3/2025 रोजी संदल वाजत गाजत मिरवणूक, ( गलप चढवणे ), व रविवार दिनांक 23/ 3/25 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून सायंकाळी 9:00 वाजता आनंद महाजन जळगावकर यांचा लोकनाट्य तमाशा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच सोमवार दिनांक 24/ 3 2025 रोजी महिला दर्शनासाठी येत आसल्याची माहिती निमसाखर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व यात्रेचे मुख्य मानकरी व श्री. संतोष जयकुमार रणवरे पाटील यांनी दिली.
या यात्रेसाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत, एम एस ई बी., आरोग्य विभाग, पोलीस खाते यांचे विशेष सहकार्य होते.
तसेच पीर साहेब उरूस यात्रा पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष संतोष जयकुमार रणवरे पाटील, निमसाखर गावचे विद्यमान सरपंच श्री धैर्यशील विजयकुमार रणवरे पाटील. सदस्य श्री सुनील ( नाना) रणवरे, श्री गजानन रणवरे, श्री राजेंद्र रणवरे, श्री धनंजय रणवरे,श्री धीरज रणवरे पाटील, श्री अजित ( दादा ) रणवरे, श्री सिद्धार्थ रणसिंग, श्री अजिंक्य आनंदराव रणवरे पाटील,श्री नंदकुमार चव्हाण, श्री.निखिल अडसूळ, श्री खुदा भाई मुलानी, लतीफ भाई मुलानी,रशीद(बाळू भाई )मुलानी, यांचे विशेष योगदान असते.