बार्शी पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी बेवारस महिलेच्या खूनाचा उलगडा. ..


बार्शी पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी बेवारस महिलेच्या खूनाचा उलगडा. ..
[ महाशाही न्यूज मराठी ]
अलीपूर रोड येथे ज्वारीच्या शेतात दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला.सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवणे अवघड होते. सुरुवातीस मृतदेहाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. परंतु , पोलिसांना याबाबत खुनाचा संशय होता.


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक [ सपोनि ] बाळासाहेब जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल [ पो. कॉ.] इसमिया बहीरे यांनी घटनास्थळाची तपासणी करून सदर प्रकरणी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असता. सदर प्रकरणी  सूत्रांमार्फत माहिती मिळाली की, सदर महिला ही बार्शी येथील अलीपूर रोड या ठीकाणी भाड्याने राहत होती आणि तिला भेटण्यासाठी एक पुरुष नियमितपणे येत होता.

या बाबत त्या महिलेच्या घरमालकाकडे  सखोल चौकशी केली असता, ती धाराशिव जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यातून बेपत्ता महिलेच्या नोंदी तपासल्या असता, दिनांक 18 नोव्हेंबर 2024 पासून गायब असलेली अर्चना विनोद शिंदे वय 32 वर्षे  राहाणार घाटंग्री, तालुका. धाराशिव हीच सदर मृत महिला असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी  मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढला. तपासामध्ये  नितीन प्रभू जाधव [ राहाणार  घाटंग्री, धाराशिव ] हे नाव पुढे आले. त्यानंतर, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक घाटंग्री येथे रवाना केले आणि आरोपीला तांत्रिक तपासाच्या आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे शोधून ताब्यात घेतले.

विश्वासाने विचारपूस केली असता, नितीन जाधवने खून केल्याची कबुली दिली. तो आणि अर्चना मजुरीच्या कामावर एकत्र जात असत, त्यामुळे त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. पुढे नितीनने अर्चनासाठी बार्शी येथे घर भाड्याने घेतले होते आणि तो तिच्याकडे नियमित जात असे. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद होत होते .

10 जानेवारी 2025 रोजी नितीनने अर्चनाला गोड बोलून ज्वारीच्या शेतात नेले आणि तीची स्कार्फने गळा आवळून हत्या केली.

तपास पूर्ण झाल्यानंतर बार्शी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 262/2025,भारतीय दंड संहितेच्या कलम 303 [खून] अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि प्रदीप झालटे करीत आहेत.

सदर यशस्वी तपासासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते. बार्शी पोलिसांच्या या उत्कृष्ट तपासकार्यामुळे एका बेवारस खुनाचा उलगडा होऊन आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...