रणसिंग महाविद्यालयात मराठी स्वाक्षरी मोहिम विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात संपन्न.....


रणसिंग महाविद्यालयात मराठी स्वाक्षरी मोहिम  विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात संपन्न.....
महाशाही न्यूज मराठी  :- रणवरे संभाजी इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे,
विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर अंतर्गत मराठी विभाग आयोजित २७ फेब्रुवारी २०२५ रोजी "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमांतर्गत मराठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव, मा. वीरसिंह रणसिंग उपस्थित होते. प्राचार्य डॉ. विजय केसकर, उपप्राचार्य,ज्ञानेश्वर गुळीग तसेच महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


यानंतर दुसऱ्या सत्रातील कार्यक्रम दृकश्राव्य माध्यमाद्वारे मा. श्री. संदीप साकोरे यांचे मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी याविषयी व्याख्यान आयोजित केले होते.


खोली क्र.१५ स्मार्ट क्लासरूम मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राम कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजय केसकर सर उपस्थित होते.

त्यांनी अध्यक्षीय समारोप करत असताना मराठी भाषेचे महत्त्व पटवून सांगितले तसेच कवी कुसुमाग्रज यांची कणा नावाची कविता सादर केली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील 42 विद्यार्थी व 22 प्राध्यापक उपस्थित होते. प्रा.योगेश बडवे यांनी हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. आणि छायाचित्र सौजन्य , डॉ.अमर वाघमोडे व सौरभ नवगन यांनी केले. 

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...