जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला..
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला..
[ महाशाही न्यूज मराठी ]
जगद्गुरू संत तुकाराम महाराजा यांच्या 375 व्या बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रसंगी देहू संस्थान चे विश्वस्त उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तुकाराम बीज निमित्त आज लाखो वारकरी देहूमध्ये दाखल झाले आहेत.

तुकोबांची पगडी, शाल, श्रीफळ, पुष्पहार, चिपळ्या, संत तुकाराम महाराजांची मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. हा सन्मान 25 वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता.
आज जगद्गुरू तुकोबांचा 375 वा सदेह वैकुंठ गमन सोहळा आहे. दुपारी ठीक बारा वाजता कीर्तनानंतर नांदूरकीच्या झाडावर पुष्प अर्पण करून हा सोहळा पार पडला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हा एकनाथ शिंदें चा शब्द आहे. धर्माचे रक्षण करणं जस आपलं कर्तव्य आहे. तसेच नद्या प्रदूषण मुक्त करण ही आपलं काम आहे. असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी व्यक्त केल .
पुढे बोलता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांना तुकोबांच मार्गदर्शन होत. आशीर्वाद होता. देहूच्या पवित्र भूमीत छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकोबांच्या भेटीला आले होते , संत तुकोबांच्या रचना आपल्या जगण्यावर भाष्य करतात. 375 वर्षानंतर ही त्या काल बाह्य झालेल्या नाहीत. पुढील 375 वर्ष च नव्हे तर 3,375 , वर्ष या रंचनांमधील मधील अर्थ लोप पावणार नाहीत. तुकोबांनी चारशे वर्षांपूर्वी क्लिष्ट अस तत्वज्ञान हे सोप्या मराठीत सांगितलं. हाच मराठीचा अभिजात दर्जा होता. अस मत ही त्यांनी व्यक्त केलं. तुकाराम महाराजांच्या शिकवणी प्रमाणे आम्ही शांततेने काम करत आहोत. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काय- काय केलं हे सर्वांना परिचित आहे. ते माझं कर्तव्य होत. वारकऱ्यांपेक्षा कुणी मोठं नाही.
वारकरी हा समाज प्रबोधनकार आहे. तुम्ही एकदा मनावर घेतल की काय होऊ शकतं, हे तीन महिन्यांपूर्वी पाहिलं आहे. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसाला ही धक्का लागू देणार नाही. हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. धर्माच रक्षण करण आपल्या सर्वांच कर्तव्य आहे. त्याच प्रमाणे इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी या नद्यांची रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. नद्यांची परिस्थिती बरी नाही. प्रदूषण मुक्तीची लोक चळवळ झाली पाहिजे. सर्व नद्या आदर्श बनल्या पाहिजेत. अस मत ही शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.