विश्वासराव रणसिंग महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी संविधान गौरव महोत्सव या उपक्रमा अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन ...


विश्वासराव  रणसिंग महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी संविधान गौरव महोत्सव या उपक्रमा अंतर्गत  कार्यशाळेचे आयोजन ...
महाशाही न्यूज मराठी  :- रणवरे संभाजी 
विश्वासराव  रणसिंग महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी संविधान गौरव महोत्सव या उपक्रमा अंतर्गत  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. ज्योत्स्ना  गायकवाड यांनी केले.  त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश  सांगितला, भारतीय  लोकशाही  टिकून राहण्यासाठी संविधान महत्वपूर्ण ठरले आहे. 


म्हणूनच  भारत हा जगाच्या पाठीवरील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखला जातो.त्या निमित्त आज भारतभर संविधान अमृत महोत्सव  साजरा केला जात आहे.असे मत त्यांनी मांडले. 


 तसेच संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन प्रा. कपिल कांबळे यांनी केले. या कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याते प्रा. डाॅ. नारायण राजूरवार मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वर बारामती, हे उपस्थित होते.

 त्यांनी भारतीय संविधानाच्या 75 वर्ष एक  समीक्षा व संविधाना समोरील आव्हाने या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता, लोकशाही  या संकल्पनांचा आढावा घेत त्याची सविस्तर माहिती दिली.

 त्याचबरोबर भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत असणारे मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, केंद्र-राज्य संबंध, यांचाही आढावा घेतला. त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये भारतीय संविधाना समोर येणारी वेगवेगळी आव्हाने त्यामध्ये आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक व तसेच राजकीय आव्हानांचा आढावा घेतला. त्यांनी आपल्या सरळ, साध्या सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांसमोर अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय संविधान समजावून  सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.विजय केसकर हे उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना संविधान गौरव महोत्सव निमित्त  संविधानाची जनजागृती व्हावी या निमित्य मार्गदर्शन केले. व अधिकार आणि कर्तव्याची जाणीव स्वतःबरोबर इतर  समाजातील व्यक्तींनाही करून द्यावी असे सांगितले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.रामचंद्र पाखरे राष्ट्रीयसेवा योजना अधिकारी प्रा.राजेंद्रकुमार डांगे व सर्व प्राध्यापक , प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अभिजीत शिंगाडे यांनी मानले तर सुञसंचालन प्रा.अस्मिता चांदगुडे यांनी केले.व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...