धाराशिव जिल्ह्यातील येरमाळ्याच्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र महिन्यातील यात्रा या वर्षी 12 एप्रिल 2025 पासून 17 एप्रिल 2025 या काळात भरणार आहे.....


धाराशिव जिल्ह्यातील येरमाळ्याच्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र महिन्यातील यात्रा या वर्षी 12 एप्रिल 2025 पासून 17 एप्रिल 2025 या काळात भरणार आहे....
[ महाशाही न्यूज मराठी ] 
 
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळ्याच्या श्री येडेश्वरी देवीची चैत्र महिन्यातील यात्रा या वर्षी 12 एप्रिल 2025 पासून 17 एप्रिल 2025 या काळात भरणार असून ,दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत...


● यात्रेचा पहिला दिवस म्हणजे शनिवार  दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी मुख्य मंदिरावर चैत्र पौर्णिमा महापूजा व छबिना रात्री 9 वाजता आहे. 

● यात्रेचा दुसरा दिवस म्हणजे रविवार  दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 वाजून 10 मींटानी मुख्य मंदिरातून पालखीचे आमराईकडे प्रस्थान व 11 वाजता चुन्याच्या शेतात चुना वेचण्याचा कार्यक्रम.

● यात्रेचा तिसरा दिवस म्हणजे सोमवार  दिनांक 14 एप्रिल 2025 या दिवशी सकाळी 11 वाजता  पशुप्रदर्शनाचा कार्यक्रम.

● यात्रेतील चौथा दिवस म्हणजे मंगळवार  दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रम व रात्री 9 वाजता अंबराईत आराध्यांच्या गाण्यांच्या मैफली चा कार्यक्रम.

● यात्रेचा पाचवा दिवस म्हणजे बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी यात्रेमध्ये रात्री 9 वाजता  शोभेच्या दारूच्या  आतिषबाजीचा कार्यक्रम.

● यात्रेचा सहावा दिवस म्हणजे गुरूवार  दिनांक 17 एप्रिल 2025  हा यात्रेचा शेवटचा दिवस आहे  दुपारी 4 वाजता अंबराईत गुगरी महाप्रसादाचा कार्यक्रम त्यानंतर पालखीचे मुख्य मंदिराकडे प्रस्थान होईल.

Popular posts from this blog

पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय , निरवांगी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे डिजिटल स्मार्ट बोर्ड चे उद्घाटन संपन्न...

बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात पित्याने मुलाचा दगडाने ठेचून केला खून...

कायदा आणि व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर्श निर्णय..! मानव अधिकार तसेच खांडवी ग्रामपंचायतचे सदस्य आकाश दळवी यांची हद्दपारी रद्द...