[ HSRP] नवीन नंबर प्लेट बसण्यासाठी 30 एप्रिल 2025 पर्यंतची मुदतवाढ...
[ महाशाही न्यूज मराठी ]
मोटार वाहन विभाग, महाराष्ट्र यांनी दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी अध्यादेश काढून महाराष्ट्रातील जुन्या व नव्या सर्वच वाहनांना HSRP [ High Security Registration Plate ] बंधनकारक केली आहे. त्यासाठी 31 मार्च 2025 ही शेवटची तारीख दिली आहे.

परंतु महत्वाचा निर्णय असूनदेखील याबाबतची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या निर्णयाची कोठेही जाहिरात किंवा साधी कल्पना देखील दिलेली नाही.
मुंबई, पुणे, नाशिक व इतरही शहरातील वाहतूक पोलीसांनी हा निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीही प्रयत्न कलेले नाहीत परंतु मुदत संपल्यावर मात्र 1 एप्रिल 2025 पासून हेच इ-चलान मशीन घेऊन रस्त्यावर उतरवतील आणि धडाधड हेच बिगर HSRP नंबर प्लेट असलेल्या वाहनावर 1000 रूपयाचे चलन , मारतील..तेंव्हा त्यांना आपल्यावर वाहनांवर HSRP चे चलान फाडण्याची संधी देऊ नका. मुदतीपूर्वीच आपापल्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट बसवून घ्या आणि याबाबत ची माहिती आपल्या ओळखीच्यांना ,मित्रांना , नातेवाईकांना द्या .